विधानसभेच्या महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुनश्च एकनाथ शिंदेच व्हावे याकरिता पुण्यातील जेष्ठ नागरिक व महिलांनी सारसबाग येथील तळ्यातील गणपतीला साकडे घातले असून एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे या जोरकस मागणीसाठी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी गणरायाला साकडे घालत एकनाथ शिंदेच ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच राज्यात निवडणुका लढविल्या गेल्या होत्या पुन्हा तेच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे असे मत व्यक्त केले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी माझी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख तयार झाली असून ते पद सर्वश्रेष्ठ आहे, गेल्या अडीच वर्षात आपण मुख्यमंत्री म्हणून केलेली विकास कामे आणि कल्याणकारी योजनांबाबत समाधानी आहोत त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली असली तरी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रस्त्यावर येवून सारसबागेत तळ्यातील गणरायाला प्रार्थना करीत लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थन उपस्थित महिलांनी केली. पुणे शहरातील अनेक माता भगिनींनी यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना तसेच अठरापगड जाती व समाजाचे नेतृत्व करणारे,सर्व धर्मियांचे लोकमान्य, लोकनेते एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे बहुमत कोणत्याही पक्षाचे असले तरीही मुख्यमंत्रीपद हे सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असल्या कारणाने सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी केली. यावेळी मोठ्या संख्येने पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.