कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे आज शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. दर्यावरचे शूर वीर तुझ्या पायाचे चाकर, तच कृपा तरी त्यासी त्यांना एकची आधार असे शिवसेना संघर्षाचे वर्णन करून देवीला साकडे घातले आणि शिवसेनेच्या शूर सैनिकांना आशीर्वाद दे अशी प्रार्थना नीलम गोऱ्हे यांनी केली.
यावेळी डॉ गोऱ्हे यांनी देवीची विधीवत पूजा आरती करत देवीला महावस्त्र अर्पण केले व श्री एकवीरा आईने जनतेला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शक्ती, उत्तम आरोग्य, सौख्य आणि यश द्यावं असा आशीर्वाद मागितला तसेच राज्यातील महिला, युवक, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या कल्याणाकरिता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात पुन्हा येऊ दे अशी देवी चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी, अनिल पडवळ,भाऊसाहेब माने,मारुती बोरकर,संतोष देवकर,विनोद देवकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या जनतेच्या कल्याणाकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी एकवीरा देवीच्या चरणी शिवसेना नेत्या...