काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश

0
10

 

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
२०२३ मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “आता लोकांना कळेल हू इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी केली. शिंदे यांच्या या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली आणि लोकसेवक काय असतो हे दाखवले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात, त्यामुळे लोकांना कळेल हू इज धंगेकर?”अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here