कसबा विधानसभा मतदार संघातून भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी

0
22

 

पुणे प्रतिनिधी :

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पर्वती माधुरी मिसाळ, कोथरूड चंद्रकांत पाटील,शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे,खडकवासला भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी सुनील टिंगरे आणि हडपसर चेतन तुपे या विद्यमान आमदारांची महायुतीमध्ये उमेदवारी कायम ठेवली आहे.
तर कसबा विधानसभा मतदार संघातून मागील पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तरी देखील त्यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे.यामुळे आता कसबा विधानसभा मतदार संघातून भाजप हेमंत रासने, काँग्रेस रविंद्र धंगेकर आणि मनसेचे गणेश भोकरे अशी तिरंगी लढत होणार आहे.
तसेच दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून हडपसर प्रशांत जगताप,पर्वती अश्विनी कदम, वडगावशेरी बापूसाहेब पठारे आणि खडकवासला सचिन दोडके यांना उमेदवारी दिली.तर दुसर्‍या बाजूला पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे की अविनाश साळवी, शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट की सनी निम्हण आणि कोथरूडमधून ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे की माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची,या तीन जागांवरुन वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.उद्या दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here