अनाथ मुलींनी लुटला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत दिवाळी खरेदीचा मनमुराद आनंद

0
28

पुणे

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, फराळ, मिठाई असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सामन्यता मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात पण ज्या अभागी मुलांच्या नशिबात हे भाग्य नाही अशा अनाथ मुलींनी दिवाळीच्या सणानिमित्ताने तुळशीबागेत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत मनसोक्त खरेदी करत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी सर्व मुलींना चॉकलेट्स, बिस्कीट आणि मिठाई भेट म्हणून दिली.

तुळशीबाग गणपती मंडळ यांच्यातर्फे दिवाळी निमित्त मुळशी येथील सूर्योदय फाउंडेशन मधील अनाथ मुलींसाठी तुळशीबाग येथे दिवाळी खरेदी च्या उपक्रमाचे आयोजन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. याप्रसंगी श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, किरण चव्हाण, जितेंद्र आंबासनकर, प्रदीप इंगळे, श्रीमती अभिनेत्री वाळके, सुनंदा इपते, लक्ष्मी भावसार, सोनी पवार, सूर्योदय फाउंडेशन च्या रोहिणी दीक्षित उपस्थित होते.
हा स्तुत्य उपक्रम या दीपोत्सवाचा निरामय आनंदापासून वंचित असलेल्या या मुलानं मायेची उब देणारा ठरेल असा विश्वास डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की या मुलींनी शिकून मोठं व्हावं, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं करियर घडवावं. तसेच तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाचे अभिनंदन करुन अत्यंत प्रामाणिकपणे या सर्व मुलींचे आदरातिथ्य केल्याबद्दल हार्दिक आभार मानले.
दिवाळीनिमित्त या मुलींच्या चेहऱ्यावर खुललेला आनंद मलाही आनंदित करतो. आपण सर्व या मुलींच्या घरातील सदस्य असल्यासारखे कायम त्यांच्या सोबत राहुया अशा हृद्य भावना डॉ गोऱ्हे यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. तसेच, मंडळाचे कार्य ही नेहमीच देदीप्यमान असे राहिले आहे. विविध सामाजिक व आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात मंडळ कायम पुढाकार घेत असते. भविष्यातही असेच कार्य मंडळाकडून सदैव घडत राहो अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी तुळशीबाग गणपती मंडळाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्या. मंडळाच्या पहिल्या महिला ट्रस्टी म्हणून अभिनेत्री वाळके यांची नियुक्ती केली त्याबद्दल त्यांनी मंडळाचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here