आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पाडली.या बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका केली.
या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे खूप गंभीर काही माहिती आहे.देशातील निवडणुका निष्पक्ष घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे.मात्र त्या अधिकाराचे उल्लंघन सुरु आहे. निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही.आपण सत्ता गमावत आहोत, या भितीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हे मोठं कारस्थान लोकशाही विरोधात रचलं आहे. त्यासंदर्भात एक महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगालाही भेटले आहेत.काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत. त्यासाठी विशेष अॅपची निर्मिती करून प्रत्येक मतदारसंघात किमान 10 हजार मते त्यामधून काढून टाकायची आणि तेवढी मते त्या ठिकाणी दुसरे बाहेरील राज्यातील टाकण्याचे कारस्थान समोर आलेलं आहे.150 मतदारसंघात हा घोळ सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपाच्या टीम या कामाला लागल्या आहेत. याचे सुत्रधार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं मला दिसत आहे. या राज्याच्या भविष्याचा हा मुद्दा आहे.मात्र आम्ही हे षडयंत्र उधळून लावू आणि वेळ पडली तर निवडणूक आयोगावर मोठा मोर्चा काढू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला