महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा स्थापना मेळावा संपन्न
राजकारणाची सध्याच्या नेत्यांनी बजबजपुरी केली आहे.कोण कुठे होता आणि कुठे असेल काहीच सांगता येत नाही.राजकारणातील हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती असून आगामी विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवणार अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्यभरातून आलेल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यावेळी ते बोलत होते.निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मिळालेल्या ‘सप्तकिरणांसह पेनाची नीब’ या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुढेकर, रघुनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, केशव गोसावी, महादेव तळेकर, महेश गवळी, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, रुपेश नाठे, विनोद परांडे, गणेश सोनवणे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव म्हणाले की, ‘स्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय पक्षांना याची धडकी भरलेली आहे त्यामुळे स्वराज्य पक्षाने लावलेले बॅनर प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने सरकार काढत असल्याचे त्यांनी सांगितले.