मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली.चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती,यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं, आता पाडापाडी करावी लागेल.आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे.आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ.एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही.एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की,आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो आणि लढणार होतो.आमचे मतदारसंघही ठरले होते.आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही.मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार.मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा,अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.