तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस

0
5

 

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून यामध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या वाटय़ाला मिळाल्या आहेत.त्यानंतर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने, तसेच विदर्भासह नागपूरच्या जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला आहे. तसेच जे लोक सांगत होते की विदर्भात आमचं पानिपत होईल, आमचं विदर्भात किंवा नागपुरात पानिपत होईल त्यांचंच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पानिपत झालं आहे. राज्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे मी राज्याच्या जनतेसह नागपूर व विदर्भाच्या जनतेचे, माझ्या कर्मभूमीचे आभार मानतो.
तसेच ते पुढे म्हणाले की,आमच्या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. हा निकाल खरोखरंच अविश्वसनीय, अभूतपूर्व असा निकाल आहे. ईश्वर आणि जनता जेव्हा आपल्याला काहीतरी देते तेव्हा भरभरून देते. जनतेने आम्हाला छप्परफाड मतदान केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here