रवींद्र धंगेकर मित्र मंडळातर्फे बाल दिवाळी आनंद मेळावा
पुणे
सनई चौघड्यांचा मंगलमयसूर…. रांगोळ्याच्या पायघड्या… पाटाभोवती केलेली आकर्षक रांगोळी… शाही अभ्यंगस्नान, फराळ आणि नवीन कपडे चिमुकल्यांना मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुलांना अभ्यंगस्नान घातले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना दिवाळीचा आनंद लुटता यावा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी रवींद्र धंगेकर मित्र मंडळातर्फे शुक्रवारी सकाळी लोहियानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील शिवराज चौक येथे ‘बाल दिवाळी आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुला मुलींना उटणे व मोती साबणाने आंघोळ घालून त्यांचे औक्षण केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना नवीन कपडे, फराळ व फटाके देण्यात आले. चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
मुलांनी फटाके, फुलबाजे फोडून आनंद साजरा केला.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, सादिकभाई शेख, चंदन पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते सोनूभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनू शेख, नगमा शेख, मालन शिंदे, मोबीना शेख, सेना शेख, हमिदा शेख, सोनिया शेख यांच्यासह स्थानिक महिला-पुरुष देखील उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हा उपक्रम प्रचाराचा भाग नाही. मी मागील 35 वर्षाहून अधिक कालावधीपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करीत आहे.या माध्यमांतून सर्व सामान्य नागरिकांशी नाळ जोडली गेली आहे.या सर्वसामान्य गरीब,गरजू,वंचित नागरिकांसोबत दिवाळी साजरी करणे हा खूप मोठा आनंद आहे.आम्ही वर्षानवर्षे सर्व धर्मीय एकमेकांमध्ये मिसळून एकोप्याने सण साजरा करतो. दिवाळी सणामधील लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणांमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.एकोपा पुढे नेण्यासाठी वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी उपक्रमात आम्ही सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.