विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. लवकरच जागावाटपही जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पक्ष प्रवेश आज मुंबईत शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे अजित पवारांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.