आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका,मेळावे घेतले जात आहेत.तर राज्यातील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विजय डाकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर त्याच दरम्यान विजय डाकले यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली.या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली.
या भेटीनंतर विजय डाकले म्हणाले की,कोथरूड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे.आमच्या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली.मतदार संघातील एकूणच परिस्थिती आणि माझ आजवर केलेल सामाजिक कार्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना माहिती दिली.तसेच मनोज जरांगे पाटील हे सर्व समाजासाठी लढा देत आहेत.त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि आम्ही त्यांच्या एकूणच भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.यापुढील काळात मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असणार असल्याचे त्यांना सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान,भ्रष्टाचारी,जातीयवादी विचारसरणीच्या लोकप्रतिनिधी आणि पक्षांचा बीमोड करायचा असेल तर आपण ही निवडणुक लढवली पाहिजे,अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली असून आम्ही एकूणच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.