रामनवमीनिमित्त शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विशेष पूजा आणि श्रीराम आरती संपन्न

0
6

 

रामनवमीच्या पावन निमित्ताने डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या निवासस्थानी श्रीराम प्रभूंच्या चरणी पंचोपचार पूजा व सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. बंगल्याच्या परिसरात श्रीराम दरबार व अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती.
आरतीपूर्वी श्रीराम पंचायतन याची पंचोपचार पूजा श्री विश्वास सिन्नरकर गुरुजी, हरी जोशी, अजित देशमुख, आदित्य दलाल गुरुजी यांच्या सहकाऱ्यांनी केली. त्यानंतर “जयदेव जयदेव निजबोधा रामा, परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्ण कामा” अशा गगनभेदी स्वरांनी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
यानंतर डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी उपस्थितांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.त्या म्हणाल्या, “जनतेला श्रीराम प्रभूंची निश्चयशक्ती, धाडस, सत्यप्रियता, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, समयसूचकता, तसेच सीतामाईंची जिद्द व वीरत्व प्राप्त होवो,” अशी मंगलकामना त्यांनी केली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सुदर्शना त्रिगुणाईत, कांता पांढरे, धनंजय जाधव, अक्षता धुमाळ, बाळासाहेब मालुसरे, नितीन पवार, आनंद गोयल, शिवसेना पदाधिकारी संदीप काळे, भाजपाचे पदाधिकारी, निसर्गोपचार आश्रमांचे नरेंद्र हेगडे, मॉडेल कॉलनी सुधारणा समितीचे श्री. मिलिंद केळकर, उद्योजिका स्वाती देवळे, सलील नंदी, रिटा नंदी आदींचा समावेश होता.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी सिल्वर रॉक्स – हरे कृष्ण मंदिर पथ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे येथे उत्साहात पार पडला.या आरतीचे आयोजन डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती – विधान परिषद, नेत्या – शिवसेना, मानद अध्यक्ष – स्त्री आधार केंद्र, पुणे) व श्रीमती जेहलम जोशी (विश्वस्त – स्त्री आधार केंद्र, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here