आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत इच्छुक नेतेमंडळी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.तर दुसर्या बाजूला जागा वाटपावरून महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली जात आहे.त्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की,आमची बेरीज चुकणार नाही, बेरीज पूर्ण होईल,आमच्या 96 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.दोन- चार जागा आमच्या मित्र पक्षांनी जास्त लढल्या आणि जिंकल्या तर त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही.विदर्भात कॉंग्रेस जास्त जागा लढत असून विदर्भात 64 जागा आहेत.तेथील कॉंग्रेस विषयी एक वेगळी भावना आहे.त्याच बरोबर आम्ही असे ठरवले आहे की, ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल तिथे त्याने लढायचे.मुंबई,कोकण,उत्तर महाराष्ट्रात शिवसेना दिसेल,पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विदर्भात कॉंग्रेस पक्ष दिसेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले की, तीन तारीखच्या अगोदर एकत्र बसून प्रत्येक मित्र पक्षातील ज्यांनी अर्ज दाखल केलेत त्यांची समजूत काढू,आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.