हे जगदंबे,साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री कर’, या आशयाचे शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी लावले फ्लेक्स

0
13

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभरात बैठका,दौरे आणि सभा घेतल्या जात आहे.तर येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे लाखों शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे.
राज्यभरातून येणार्‍या शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणे जरुरीचे आहे.पण त्या सर्व घडामोडी दरम्यान शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी ‘हे जगदंबे,साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री कर’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स शहरातील विविध भागात लावले आहे.तर या फ्लेक्सची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे.
या बाबत शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की,राज्यातील शिवसैनिक वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.तो दिवस म्हणजे दसरा मेळावा,या दसरा मेळाव्यास पुणे शहरातील हजारो शिवसैनिक मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकणार आहोत,या मेळाव्याच्या माध्यमांतून आम्हाला आगामी काळात अधिक काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे.तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत.हा तमाम शिवसैनिकांचा निर्धार असणार असून हीच प्रार्थना देवीच्या चरणी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here