‘ते’ सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स असतं : सरसंघचालक मोहन भागवत

0
17

 

 

 

OTT प्लॅटफॉर्म्स हा आजच्या काळातला मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या वेबसीरिज, चित्रपट, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असा अगणित मजकूर या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रदर्शित केला जातो. प्रौढांसाठीच्या मजकुराला तसं प्रमाणपत्र व सूचना देऊन प्रदर्शित केलं जातं. पण सर्वच प्रकारचा मजकूर या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. याचसंदर्भात आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्ताने नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणातून तीव्र आक्षेप नोंदवला.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने नागपूरमधील मुख्यालयात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार सकाळी संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन व मान्यवरांची भाषणं झाली. शेवटी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणातून त्यांची भूमिका मांडली. दरवर्षी दसरा मेळाव्याला सरसंघचालक आपल्या भाषणात कोणते विचार मांडणार? याची चर्चा संघ स्वयंसेवकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातही असते. आज त्यांनी केलेल्या भाषणात भारतातील सद्य परिस्थितीबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावरही केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे.
यावेळी सरसंघचालक डॉ मोहन भागवत म्हणाले की,
ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वगैरैंवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स असतं. त्यामुळेच मी म्हणतो की या सगळ्यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे. संस्कार भ्रष्ट होण्यामागचं एक मोठं कारण तेही असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here