समस्त कोकणवासीय मेळाव्यात सिद्धार्थ शिरोळेंना जाहीर पाठिंबा
शहराच्या अनेक भागांमध्ये कोकणाच्या विविध तालुक्यांमधून आलेल्या लोकांची वस्ती आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत गोखलेनगर, गुंजाळवाडी, जनवाडी या परिसरात सुमारे अडीच हजार कोकणवासीय नागरीक राहतात. या समाजातील अनेक कुटुंबांना नोकरी – व्यवसायासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मदतीचा हात दिला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील समस्त कोकणवासीय नागरीकांच्या रविवारी (दि. १०) पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात कोकणवासीय नागरिकांची गर्दी आपल्या पाठीराख्याच्या याच मदतीविषयीची कृतज्ञता दर्शवीत होती.
बहुतांश कोकणवासीय हॉटेल कामगार आहेत. काही प्रमाणात नोकरी आणि छोट्या-मोठ्या व्यवसायातही त्यांनी जम बसवला आहे. नोकरी-व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी, गरीब घरांतील मुलांच्या शिक्षणासाठी, ज्येष्ठांच्या आजारपणासाठीही सिद्धार्थ शिरोळे यांनी सढळ हस्ते मदत केली आहे.
समस्त कोकणवासीय नागरिकांच्या मेळाव्याला सुमारे एक हजार नागरिक उपस्थित होते. त्यातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मदतीबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी उपस्थित होता. यावेळी सर्व कोकणवासीय नागरीकांच्या वतीने या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला.
पूजा जागडे आणि आकाश गजमल यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौरभ कर्डे, ओंकार केदारी, संगीता निकम, खुशी लाटे, रविराज यादव, शुभम हिंगाडे, अमृता म्हेत्रे, ॐ हनुमान देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व कोकणवासीय महासंघाचे पदाधिकारी, आणि कोकणवासीय नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणवासीय नागरीक जरी नोकरी-व्यवसायासाठी पुण्यात स्थायिक झाले असले तरी त्यांची मूळ गावाशी नाळ अजूनही कायम आहे. त्यामुळे मालवण, संगमेश्वर, चिपळूण, कुडाळ, रत्नागिरी इत्यादी गावांतच त्यांची मूळ घरे, देवस्थाने आहेत. तिथे दरवर्षी न चुकता सणवाराला ते जात असतात. त्या मूळ गावांपैकी ओम हनुमान देवस्थान ट्रस्टच्या मंदिरासाठी, संगमेश्वरमधील एका गावकीला स्वयंपाकाच्या भांड्यांसाठीही सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्तिगत निधीतून आर्थिक मदत केली आहे.