पुणे
मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत 29 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या.परंतु त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.शायना एन. सी यांच्याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की,त्यांची अवस्था पहा.त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही.तर आमच्या इथे ओरिजनल माल चालतो,असे विधान केले.या विधानावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुवात झाली आहे.
या प्रकरणावर शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,अरविंद सावंत हे महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजत आहेत.आता त्या विधानावर अरविंद सावंत हे सारवासारव करीत आहेत. तसेच स्त्रीयांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नसून अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.