हे माझ्या पक्ष निष्ठेच फळ आहे : प्रशांत जगताप

0
18

हडपसर विधानसभा मतदार संघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर

पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.त्या पहिल्या यादीत पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची घोषणा करताच, कार्यकर्त्यांनी करण्यास सुरुवात केली.तर यावेळी जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन निवडणुकी बाबत शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या.
खासदार बजरंग सोनवणे,प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सह अन्य उमेदवार उपस्थित होते.
प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच,प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की,हडपसर विधानसभा मतदार संघातून मला निवडणुक लढविण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून हडपसर विधानसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली आहे.त्याबद्दल मी त्यांचा आभारी असून मागील दीड वर्षाच्या काळात माझ्यासह राज्यातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता साहेबांच्या पाठीशी उभा राहिला.त्यापैकी मी एक असून निष्ठेने साहेबांसोबत राहिलो.हे माझ्या पक्ष निष्ठेच फळ मला आज मिळाल आहे.या संधीच मी निश्चित सोन करेल आणि वयाच्या 83 व्या वयात पवार साहेबांना जे सोडून गेले.त्या सर्वांना राज्यातील जनता धडा दाखवल्या शिवाय राहणार नाही.तसेच हडपसर विधानसभा मतदार संघात तुतारी निश्चित वाजणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here