हडपसरमधून शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या उमेदवारीसाठी हजारो शिवसैनिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली

0
14

 

पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर या पहिल्या यादीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
तर दुसर्‍या बाजूला महायुती मधील महत्त्वाचा घटक असलेला शिवसेना पक्षाकडून अद्याप पर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही.त्यामुळे राज्यातील कोणते मतदार संघ महायुती मधून शिवसेनेच्या वाट्याला सोडले जातात.याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले असून सोमवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याच दरम्यान शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी,या मागणीसाठी आज सायंकाळच्या सुमारास हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करित महाआरती केली.
यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की,मी 30 वर्षापासुन राजकीय आणि समाजिक जीवनात काम करीत आलो आहे.या काळात प्रभाग आणि विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास काम केली आहेत.त्या काळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत नागरिक माझ्या पाठीशी राहून मला विजयी केले आहेत.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हडपसर विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळावी,यासाठी माझ्या मतदार संघातील नागरिकांनी श्री प्रभू राम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली आहे.यामध्ये मी सहभागी झालो आहे.एवढ्या मोठ्या संख्येने मला उमेदवारी मिळावी यासाठी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेल्या तमाम नागरिकांचा मी कायम ऋणी राहिल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
तसेच ते पुढे म्हणाले की,मला हडपसर विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उमेदवारी देतील आणि मी या मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here