एकनाथ शिंदे साहेब हडपसरच्या वाघाला विधानसभेचे तिकीट साथ द्या,एकनाथ शिंदे साहेब पुण्यातील शिवसैनिकांना ताकद द्या, या आशयाचे फलक हातामध्ये घेऊन शिवसैनिक मुंबई च्या दिशेने निघाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपाकडून पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.या यादीत कोथरूड येथून चंद्रकांत पाटील,शिवाजी नगर मधून सिद्धार्थ शिरोळे आणि पर्वती विधानसभा मतदार संघातून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना भाजप नेतृत्वाने पुन्हा संधी दिली आहे. मात्र या महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप पर्यंत यादी जाहीर करण्यात आली नसून केव्हा उमेदवार जाहीर करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.तर महायुतीमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली जाणार आहे.याबाबत बोलले जात आहे.यामुळे महायुतीमध्ये इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर आज सायंकाळपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्याच दरम्यान काल सायंकाळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी,या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली.या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले.आता त्यानंतर हडपसर मतदार संघातील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहे.शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसर मतदार संघ हा शिवसेनेसाठी सोडावा आणि या जागेवरून नाना
भानगिरे यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणीसाठी शिवसैनिक पायी चालत निघाले असून एकनाथ शिंदे साहेब हडपसरच्या वाघाला विधानसभेचे तिकीट साथ द्या,एकनाथ शिंदे साहेब पुण्यातील शिवसैनिकांना ताकद द्या, या आशयाचे फलक हातामध्ये घेऊन शिवसैनिक मुंबई च्या दिशेने निघाले आहेत.