भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, दिनांक 14 एप्रिल, 2025 रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-4 श्री.शिवदर्शन साठ्ये, उप सचिव श्री.विजय कोमटवार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा.उप सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.