उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल : संजय राऊत
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हेच किंगमेकर असतील अस विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे.या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आल असून त्याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना नवाब मलिक यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की,निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे.पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल आणि
या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं असेल अशा शब्दात नवाब मलिक यांना टोला लगावला.