आपल्याला लुबाडणाऱ्या माणसांना सरळ करायला आपण निवडणुकीच्या मैदानात : संभाजीराजे छत्रपती

0
10

 

आपल्याला लुबाडणाऱ्या माणसांना सरळ करायला आपण निवडणुकीच्या मैदानात उभे आहोत. त्यामुळे शेतमजुराच्या मुलाला मतदान करा असे जाहीर आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आज शेगांवमध्ये केले.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर, बुलढाणा विधानसभेच्या उमेदवार प्रेमलताताई सोनवणे, मेहकर मतदारसंघाचे उमेदवार व ऑल इंडिया पॅंथरचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला शेगांवकरांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आपली लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे. या लढाईत शेतमजूराच्या मुलाच्या बाजूने उभे राहणे हे शिवछत्रपतींच्या वंशजाचे कर्तव्य आहे, आणि तेच कर्तव्य पार पाडण्यासाठी मी इथं आलेलो आहे. भाजपच्या आमदाराला तीन टर्म मिळाल्यात, पण विकास काय केला ? मोदी म्हणतात की,आमचा पक्ष विचारांनी जाणारा, पण हीच लोकं अजितदादानी ७४ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं सांगतात आणि पुढच्या आठवड्यात त्यांना उपमुख्यमंत्री पद देतात. आता निवडणुकीत यांनी म्हणे संकल्पपत्र बनवलं आहे, ज्यात कर्ज माफी करू आणि हमी भाऊ देऊ असं म्हटलं आहे! पण मग इतके वर्ष सत्ता असूनही हे का केलं नाही असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी केला.स्वराज्याची स्थापना करत असताना ज्यांनी शिवछत्रपतींना विरोध केलं होता, त्यांची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. स्वराज्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जागा दाखवत त्यांना कठोर शासन केलं, त्याचप्रमाणे आत्ता महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याला आपण त्याची जागा दाखवून देऊ, असे छत्रपती संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here