पुण्यात ठाकरे गटाकडून फ्लेक्सबाजीमधून महायुती सरकारवर निशाणा
मागील काही महिन्या पासून राज्यातील महिला,मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.त्याच काळात ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अभिषेक घोसाळकर आणि अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा खून झाल्याची घटना घडली.या सर्व घटनांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूणच परिस्थितीवर भाष्य करणारे फ्लेक्स ठाकरे गटाकडून शहरातील विविध भागात लावले आहे.
मुली,महिलांवर होणारे अत्याचार ! अभिषेक घोसाळकर व बाबा सिद्दीकी खून,महाराष्ट्रात आम्ही कायदा सुव्यवस्था राखू शकलो नाही…तमाम जनतेने आपली सुरक्षा स्वतःच करावी.संत एकनाथ ! देवा भाऊ अशा मजकुराच्या फ्लेक्सबाजीच्या माध्यमांतून पुण्यातील ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.तर या फ्लेक्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.