आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महा विकास आघाडीतील नेते मंडळी राज्यभरात बैठका,मेळावा घेऊन नागरिकां पर्यंत पोहोचत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते.
त्यावेळी अजित पवार यांनी प्रसाराची माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधत अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली.जागावाटपाच्या चर्चेमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊन भाजपा मोठा भाऊ होऊ पाहत आहे का ? त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,आमच्या तिघांच्या सहमतीनं झालं तर तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे ? आम्ही युती केली आहे.युती करताना आम्ही काय करावं हे आम्ही ठरवणार.आम्ही उमेदवारांची देवाण-घेवाण केली. जिथे आमच्याकडे चांगले उमेदवार होते पण ती जागा आम्हाला मिळाली नाही. ती त्यांना दिली. लहू कानडेंना काँग्रेसनं तिकीट नाकारलं. श्रीरामपूरची जागा मी घेऊन लहू कानडेंना ती जागा दिली. हे काही फक्त आज होत नसून २०१४, २०१९ लाही हे झालं असल्याचे त्यांनी सांगितले.