यंदाही कसबा विधानसभा आम्हीच जिंकणार : रवींद्र धंगेकर

0
13

कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवारी अर्ज रविंद्र धंगेकर यांनी भरला

 

कसबा हा कुणाचाच गड नाही तर कसबा हा केवळ जनतेचा गड आहे.यंदाही कसबा आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.माझ्या विरोधात भाजप संपूर्ण ताकद वापरत आहेत.पण जनता माझ्या बाजूने असल्याने विजय माझा निश्चित आहे,असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर विरोधक अपप्रचाराची खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र जनता त्यांचा डाव हाणून पाडणार असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्नीसह मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून गणरायाचा आशीर्वाद घेत आपल्या उमेदवारीचा अर्ज सोमवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दाखल केला.
श्री कसबा गणपतीची आरती करून व आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली. लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. यावेळी काढलेल्या रॅलीत नागरिक, कार्यकर्ते व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाई बरोबरच महिला व ज्येष्ठांनी रॅलीत सहभाग घेतला. रवींद्र धंगेकर यांचा विजय असो, असा जयघोष करण्यात आला.
काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी मार्गाने पुढे जात असताना चौकात चौकातील गणेश मंडळांकडून रविंद्र धंगेकर यांचे स्वागत करण्यात येत होते.कार्यकर्त्यांना पाणी शरबत नागरिक देत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here