लढणार अन जिंकणार,निष्ठेचा विजय होणार

0
23

हडपसर विधानसभा मतदार संघात प्रशांत जगताप यांच्या फ्लेक्सची चर्चा

पुणे

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बैठका, मेळावे,रॅलीच आयोजन केले जात आहे. तर दुसर्‍या बाजूला इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडिया आणि मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स बाजीच्या माध्यमांतून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान हडपसर विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे ‘लढणार अन जिंकणार,निष्ठेचा विजय होणार’ या आशयाचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या फ्लेक्सची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
याबाबत हडपसर विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले प्रशांत जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मी राजकीय आणि समाजिक जीवनात जवळपास 25 वर्षापासुन आहे.या कालावधीत एका कार्यकर्त्यांला नगरसेवक ते पुणे शहराच महापौर करण्याच काम शरद पवार यांनी केले आहे.तसेच माझ्यावर पक्षांने आजवर जी जबाबदारी दिली.ती कायम पार पाडत आलो असून दीड वर्षापूर्वी पक्षात राजकीय घडामोडी घडल्या.त्यावेळी अनेक नेते त्यांच्या (अजित पवार) सोबत गेले.पण माझ्यासह शरद पवार यांच्या सोबत कार्यकर्ते राहिले.
तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाला चांगले यश मिळाले आहे.हे लक्षात घेतल्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असून महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदार संघातून मी इच्छुक असून मी मुलखात देखील दिली आहे.या मतदार संघातून महाविकास आघाडीमधील अनेक नेते इच्छुक असले तरी मलाच उमेदवारी मिळेल आणि मी निश्चित जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here