पर्वती विधानसभा मतदार संघातून भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर
पुणे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर या पहिल्या यादीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की,मागील तीन वेळा पर्वती मतदारसंघातील मतदारांनी मला प्रचंड बहुमताने विजयी केले.यंदा पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी पक्षाची, महायुतीची ऋणी आहे.तसेच गेल्या पंधरा वर्षात पर्वती परिसरासाठी मी केलेल्या विकासकामांचे साक्षीदार असलेले मतदार मला पुन्हा एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की,या मतदार संघातून अनेक जण इच्छुक होते.यातून लोकशाही जिवंत असण्याची लक्षण आहेत.त्यामुळे इच्छुकांनी मागणी करण,यामध्ये काही गैर नसून अखेर पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी माझी 15 वर्षातील काम पाहून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.त्याबद्दल सर्वांची आभारी आहे.येत्या काळात आणखी विकास काम केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.