कसबा विधानसभा मतदार संघातील बहिणी हेमंत रासने यांच्या पाठीशी : स्वरदा बापट

0
13

 

महिलांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या आरोग्याची सदैव काळजी घेणाऱ्या हेमंत रासने यांच्या पाठीशी कसबा मतदारसंघातील लाडक्या बहिणी भक्कमपणे उभ्या असल्याचा विश्वास भाजपच्या शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी व्यक्त केला.
मृणालिनी रासने, ज्योत्स्ना सरदेशपांडे, ॲड. गायत्री खडके, योगिता गोगावले, रीना सपकाळ, माधुरी पंडित, रुपाली कदम, धनश्री कदम, श्रेया रासने, सोनाली सिद्ध आणि माधुरी मोधर या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रासने यांच्या प्रचारार्थ घरोघर संपर्क साधून प्रचार करीत आहेत.
यावेळी स्वरदा बापट म्हणाल्या की, हेमंत रासने यांच्या पुढाकारातून कसबा मतदारसंघातील बारा हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अहे. त्यांच्या खात्यात प्रत्येकी महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होत आहेत. राज्यात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी महायुती सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. त्या योजनेतून त्या मुलीला अठरा वर्षांची झाल्यानंतर एक लाख रुपये मिळतील. या योजनेला ही मोठा प्रतिसाद मिळत आहे. एसटी बस प्रवासासाठी 50 टक्के सवलतीचा महिलांना फायदा होत आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या योजनांची मतदारसंघात जनजागृती करून अधिकाधिक लाभ मिळवून देण्यात हेमंतभाऊ आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांचे मोठ्या संख्येने मतदान महायुतीला होईल याचा विश्वास वाटतो.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यांचे कार्य हेमंत रासने पुढे नेत आहेत. विविध क्षेत्रांत रणरागिणींना स्त्री शक्ती सन्मानाने गौरविण्यात येते. दरवर्षी वीस हजार महिलांचे हळदीकुंकू, रक्षाबंधन, कन्यापूजन, महाभोफ्लडला आदी उपक्रमांद्वारे संस्कृतीचे जतन केले जाते. आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे आणि औषधांचे मोफत वाटप, लहान मुलांच्या ह्दय शस्त्रक्रिया, कॅन्सर रुग्णांना पेट स्कॅन व केमोथेरपी, श्रवण यंत्रांचे वाटप, रक्त तपासण्या आदी आरोग्य सुविधांचा तेरा हजारहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here